शहीद रामेश्वर काकडे Birth- 9 Jan 2019 छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण आलेल्या रामेश्वर वैजिनाथ काकडे या निमलष्करी जवानाच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी गौडगाव येथे (जि. सोलापूर ता. बार्शी) शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद काकडे हे गरीब कुटुंबातील असून गेल्याच वर्षी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना तीन महिन्यांचा मुलगा आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलीसह वृध्द आई-वडील आणि दोन बहिणी आहेत. छत्तीसगड येथे नक्षलग्रस्त भागात काकडे हे सेवा बजावत असताना नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी गौडगाव येथे आणण्यात आले होते. तेथेच त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शोकाकूल झालेल्या संपूर्ण गौडगावात चूल पेटली नव्हती. काकडे हे २०१२ साली जम्मू काश्मीरमध्ये लष्करात रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी विविध राज्यांच्या सीमांवर सेवा बजावली होती. अलीकडे त्यांची सेवा छत्तीसगडमध्ये नक्षलवादी भागात सुरू होती.
manojdole1.laskill@blogger.com